आमचे जागतिक कौशल्य, आपल्या स्थानिक यशासाठी

ओसीपी न्युट्रिक्रॉप्स, मोरोक्कन OCP ग्रूपची एक उपकंपनी, अन्न सुरक्षा आणि निर्वाहक्षमता यांपुढ्यातील जागतिक पातळीवरील आव्हानांवर तोडगा काढणारे, मातीचे आरोग्य आणि पिक पोषण उपाय विकसित करण्याच्या कार्यासाठी समर्पित आहे. आम्हाला फॉस्फेट उद्योगामध्ये शतकाहून अधिक वर्षांचे कौशल्य लाभलेले असल्यामुळे, आम्ही OCP ग्रूपच्या अतुलनीय संसाधनांचा पुरेपूर वापर करून घेतो, ज्यांमध्ये जगातील ज्ञात फॉस्फेट साठ्यापैकी 70% साठ्याची विशेष उपलब्धता आणि जगातील सर्वांत मोठे, वर्षभरात 13 दशलक्ष मेट्रिक टन खत निर्माण करणारे खत निर्मिती केंद्र यांचाही समावेश होतो.
भारताच्या शेतीविकासाचा वर्षांनुवर्षांपासूनचा साथीदार
OCP अनेक दशकांपासून उच्च दर्जाचा फॉस्फेटिक कच्चा माल आणि तयार उत्पादनांसह भारताच्या खत क्षेत्राला पाठबळ देत आहे. OCP Nutricrops च्या माध्यमातून, संस्था कृषी तज्ज्ञ आणि स्थानिक भागीदारांसोबत काम करून मातीचे आरोग्य, उत्पादनक्षमता आणि दीर्घकालीन शाश्वतता वाढवणाऱ्या विशेष कृषी पद्धतींना प्रोत्साहन देते. TSPच्या सहाय्याने, OCP Nutricrops भारतीय शेतकऱ्यांना उच्च-फॉस्फेट पोषण उपलब्ध करून देत असून कृषी क्षेत्राच्या मजबूत विकासाला गती देत आहे.
शेतकऱ्यांसाठी त्यांच्या गरजेनुरुप उपाययोजना
OCP Nutricrops विशेष गरजांनुसार तयार केलेल्या खतांच्या आणि डिजिटल कौशल्याच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना जमिनीचे पोषण सुधारण्यास मदत करत आहे. हा सक्षम दृष्टिकोन मातीचे आरोग्य सुधारतो, उत्पादन वाढवतो आणि पर्यावरणाचे संरक्षण करतो. 4R पोषण व्यवस्थापनाच्या तत्त्वांवर आधारित, TSP हे एकल-अन्नद्रव्य असलेले फॉस्फरस खत आहे, जे पिकांच्या वाढीस आणि उत्पादनक्षमतेला अधिकतम करण्यासाठी जलद परिणामकारक व गरजेनुसार अचूक पोषण प्रदान करते.
अभिनवतेस आणि निर्वाहक्षमतेस कटिबद्ध
OCP ग्रूपच्या कौशल्याच्या आणि आद्यकर्मी गुणांच्या बळावर, उत्पादकतेस आणि निर्वाहक्षम वृद्धीस चालना देण्याकरीता आणि आमच्या ग्राहकांना दीर्घकाळ टिकणारे मूल्य मिळवून देण्याकरीता, आम्ही सातत्याने आमच्या प्रक्रियांमध्ये अभिनवता आणतो आणि प्रगती करत राहतो. TSP हे OCP Nutricrops च्या शाश्वत शेतीसाठी नाविन्यपूर्ण आणि गरजेनुसार उपाय देण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.