आमचे जागतिक कौशल्य, आपल्या स्थानिक यशासाठी

ओसीपी न्युट्रिक्रॉप्स, मोरोक्कन OCP ग्रूपची एक उपकंपनी, अन्न सुरक्षा आणि निर्वाहक्षमता यांपुढ्यातील जागतिक पातळीवरील आव्हानांवर तोडगा काढणारे, मातीचे आरोग्य आणि पीक पोषण उपाय विकसित करण्याच्या कार्यासाठी समर्पित आहे. आम्हाला फॉस्फेट उद्योगामध्ये शतकाहून अधिक वर्षांचे कौशल्य लाभलेले असल्यामुळे, आम्ही OCP ग्रूपच्या अतुलनीय संसाधनांचा पुरेपूर वापर करून घेतो, ज्यांमध्ये जगातील ज्ञात फॉस्फेट साठ्यापैकी 70% साठ्याची विशेष उपलब्धता आणि जगातील सर्वांत मोठे, वर्षभरात 13 दशलक्ष मेट्रिक टन खत निर्माण करणारे खत निर्मिती केंद्र यांचाही समावेश होतो.
भारताच्या शेतीविकासाचा वर्षांनुवर्षांपासूनचा साथीदार
भारतामध्ये गेल्या अनेक दशकांपासून ओसीपी अस्तित्वात असून, ती देशाच्या खत क्षेत्राला दर्जेदार फॉस्फेटिक कच्चा माल आणि तयार खत पुरवत आली आहे. अलीकडील काळात, मातीचे आरोग्य सुधारणाऱ्या, उत्पादकता वाढवणाऱ्या, आणि शेतीची दीर्घकालीन निर्वाहक्षमता वृद्धिंगत करणाऱ्या, प्रगत आणि गरजेनुरुप शेतकी प्रथांच्या स्वीकाराचा प्रचार करण्यासाठी, ओसीपी न्युट्रिक्रॉप्स भारतामधील कृषिअर्थशास्त्रज्ञांसोबत, तज्ज्ञांसोबत आणि स्थानिक हितसंबंधींसोबत अगदी जवळून काम करते आहे.
शेतकऱ्यांसाठी त्यांच्या गरजेनुरुप उपाययोजना
शेतकरी-अभिमुख पद्धतीतून, ओसीपी न्युट्रिक्रॉप्स भारतीय शेतकऱ्यांना, विशिष्ट पिकाच्या गरजा आणि प्रादेशिक परिस्थिती यांच्या संदर्भाने मातीचे पोषण वाढवण्यास मदत करत आहे. मातीचे प्रगत मॅपिंग (मानचित्रण), गरजेनुरुप खते आणि डिजिटल नैपुण्याच्या माध्यमातून, मातीचे आरोग्य वाढवणारे, उत्पादनास चालना देणारे आणि पर्यावरणाचे रक्षण करणारे, प्रभावी आणि निर्वाहक्षम उपाय शेतकऱ्यांना मिळवता येतील याची आम्ही खात्री करतो.
अभिनवतेस आणि निर्वाहक्षमतेस कटिबद्ध
OCP ग्रूपच्या कौशल्याच्या आणि आद्यकर्मी गुणांच्या बळावर, उत्पादकतेस आणि निर्वाहक्षम वृद्धीस चालना देण्याकरिता आणि आमच्या ग्राहकांना दीर्घकाळ टिकणारे मूल्य मिळवून देण्याकरिता, आम्ही सातत्याने आमच्या प्रक्रियांमध्ये अभिनवता आणतो आणि प्रगती करत राहतो.