4R पोषण स्टुअर्डशिप

ओसीपी न्युट्रिक्रॉप्स पिकाची उत्पादकता, नफ्याचे प्रमाण आणि निर्वाहक्षमता वाढवण्यासाठी 4आर पोषण स्टुअर्डशिपचा पुरस्कार करते. आम्ही शेतकऱ्यांना सर्वोत्तम व्यवस्थापन प्रथांनी (BMPs) साहाय्य पुरवतो, ज्या स्थानिक प्रथांना अनुसरून, खतांचा पुरेपूर वापर करणाऱ्या आणि पोषणाचा ऱ्हास कमीत कमी होऊ देणाऱ्या असतात. यामुळे पोषणाचा पुरवठा पिकाच्या गरजांशी जुळवून घेता येतो, ज्यातून कार्यक्षमता वाढते आणि पर्यावरणाचे रक्षण होते. 4आर स्टुअर्डशिप ही निर्वाहक्षम शेतीची आणि शेतीच्या सशक्त यंत्रणांची गुरूकिल्ली आहे असा आमचा विश्वास आहे.

योग्य स्रोत

पिकाच्या गरजांशी जुळवून घेणारा खताचा प्रकार निवडला जातो.

योग्य वेळ

पिकांना हवी असतात तेव्हा पोषकद्रव्ये त्यांना उपलब्ध करून दिली जातात.

4R

योग्य दर

पिकांच्या गरजांनुसार त्या प्रमाणात खत दिले जाते.

योग्य जागा

पिकांना वापरता येतील अशा ठिकाणी पोषकद्रव्ये राहतात.

एक माहिती आणि ग्राहकाभिमुख पद्धत

ओसीपी न्युट्रिक्रॉप्स माहितीवर आधारित सानुकूलनाचे सामर्थ्य वापरण्यासाठी चार परस्पर संबंधित प्रमुख पावले उचलते : मातीचे विश्लेषण, शेतकरी अभिमुख उपाय, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि गरजेनुरुप (सानुकूलित) उत्पादनाचा विकास. या प्रक्रियेतून संसाधनांचा पुरेपूर वापर होण्याची आणि शेतकऱ्यांना खरे मूल्य मिळवून देण्याची खात्री मिळते.

पहिले पाऊल

मातीच्या गरजा

मातीचे विश्लेषण आणि डिजिटल मॅपिंग (मानचित्रण) केल्याने, पोषणाच्या गरजा ओळखता येतात आणि प्रत्यक्ष त्या-त्या वेळी गरजेनुरूप शिफारसी देता येतात; यामुळे अचूकपणे, क्षेत्र-विशिष्ट खताचा वापर करता येतो. परिणामत: शेती अधिक कार्यक्षम, निर्वाहक्षम आणि उत्पादक होते.

दुसरे पाऊल

शेतकरी आणि ग्राहक अभिमुखता

ओसीपी न्युट्रिक्रॉप्स शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना तिच्या नीतीच्या केंद्रभागी ठेवते, ज्यामुळे त्यांच्या वापराच्या आणि विशिष्ट गरजांचे सखोल आकलन शक्य होते आणि त्यांना दिला जाणारा प्रत्येक उपाय विचारपूर्वक घडवलेला असल्याची, आणि त्यांच्या प्रवासात तो विनासायास जोपासला जाण्याची खात्री होते.

चौथे पाऊल

सानुकूलित (गरजेनुरुप) उपाययोजना

मातीविषयीची माहिती, ग्राहकाने दिलेली माहिती, आणि डिजिटल तंत्रज्ञान यांचा मेळ साधून, ओसीपी न्युट्रिक्रॉप्स असे सर्वसमावेशक, मूल्यवान उपाय पुरवते जे साध्या खतापलीकडे सेवा पुरवतात – ती शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजांवर तोडगा काढणारी, त्यांच्या गरजेनुरुप तयार केलेली पॅकेजेस देते आणि दीर्घकालीन प्रभाव निर्माण करते.

तिसरे पाऊल

माहिती आणि डिजिटल तंत्रज्ञान

ओसीपी न्युट्रिक्रॉप्स प्रगत शेती उपायांच्या माध्यमातून अभिनवतेस चालना देते, जिला तज्ज्ञांच्या जागतिक महाजालाचे सामर्थ्य लाभलेले असते आणि ती डिजिटल तंत्रज्ञानाने समृद्ध असते – यातून शेतकऱ्यांना खरे मूल्य मिळवून देणारे सुसंकलित, अतिप्रभावी पाठबळ मिळते.
Scroll to Top