पिकावर भर देणारे उपाय

ट्रिपल सुपर फॉस्फेट (TSP) अनेक प्रकारच्या पिकांसाठी अनुरूप आहे उदा. डाळी, तृणधान्ये, तेलबिया आणि कापूस, ऊस व बटाटा, इ. इतर पिके, ज्यांना खूप जास्त फॉस्फरसची गरज असते.
Scroll to Top

पिकावर भर देणारे उपाय

डाळी

TSP डाळींसाठी आदर्श आहे कारण डाळी मुळाच्या आणि नॉड्युलच्या (ग्रंथींच्या) विकासाकरिता फॉस्फरसवर खूप अवलंबून असतात. TSP मधील फॉस्फरसच्या उच्च प्रमाणामुळे ऱ्हिझोबियासारख्या जैवखतांसोबत मिसळल्यावर PUE सुधारते. डाळींमध्ये नायट्रोजनची गरजही कमी असल्याने TSP एक अनुरूप खत ठरते.

उडीद आणि मूग

मसूर

तूर

हरभरा

पिकावर भर देणारे उपाय

तृणधान्ये

भात, गहू आणि मक्यासारख्या तृणधान्याच्या पिकांसाठी फॉस्फेट अत्यावश्यक असते कारण ते मुळांच्या विकासामध्ये, ऊर्जा स्थलांतरणामध्ये (ATP संश्लेषण), आणि वनस्पतीच्या एकंदर चयापचयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. हे रोगाचा चांगला प्रतिकार होण्यास आणि तणाव सुसह्यतेस मदत करते. फॉस्फेटचा पुरेसा वापर केल्याने उत्पादकता आणि धान्याची गुणवत्ताही वाढते.

गहू

भात

मका

पिकावर भर देणारे उपाय

तेलबिया

तेलबियांमध्ये, फॉस्फरस मुळांच्या वाढीला, बीज निर्मितीला आणि पोषणाच्या ग्रहणाला चालना देते, ज्यामुळे जोम वाढतो आणि तणावाप्रती प्रतिकारही सुधारतो. TSP च्या वापरामुळे ऊर्जा स्थलांतरास, लवकर सुस्थापना होण्यास आणि वनस्पतीचा सशक्त विकास होण्यास चालना मिळते. यामुळे तेलाचे प्रमाणही वाढते, ज्यामुळे उत्पादन आणि गुणवत्ता वाढण्याची खात्री मिळते. यथायोग्य वापर केल्याने पिकाची उत्पादकता जास्तीत जास्त वाढते.

सोयाबीन

भुईमूग

मोहरी

पिकावर भर देणारे उपाय

इतर पिके

कापूस: TSP मध्ये फॉस्फरस उच्च प्रमाणात असल्याने मुळांच्या विकासाला, लवकर सुस्थापना व्हायला आणि बोंड निर्मितीला आधार मिळतो. यामुळे फुले येण्याची, तंतूंच्या गुणवत्तेची, तणावाप्रती प्रतिकाराची आणि पिकाच्या एकंदर कामगिरीची खात्री मिळते.

ऊस: TSP सशक्त मुळांना, लवकर फुटवे निघण्याल, आणि पोषणाच्या ग्रहणाला चालना देते. हे साखरेचा संचय, रोग प्रतिकार आणि झाडाचा एकंदरीत जोम वाढवून जास्त उत्पादन मिळवून देते.

बटाटा: TSP मुळाच्या विकासाला आणि कंद निर्मितीला मदत करते. हे पिष्टसंचय, पोषणाचे अवशोषण आणि पिकाचा दर्जा वाढवते.

कापूस

ऊस

बटाटे